(मुलगी सौंदर्यासोबत रजनीकांत)
मुंबईः सोमवारी बॉलिवूड अभिनेता आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा आणि सोनाक्षी सिन्हा हिचा भाऊ कुशचे वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित या रिसेप्शन पार्टीत अभिनेता रितेश देशमुख सर्वप्रथम पोहोचला.
त्यानंतर
अमिताभ बच्चन, जया बच्चन, रजनीकांत आणि त्यांची लेक सौंदर्या, सलीम खान, सनी देओल, विवेक ओबरॉय आणि त्याची पत्नी प्रियांका, बोनी कपूर, वाशू भगनानी, भूषण कुमार, मधुर भंडारकर, अहाना देओल आणि तिचे पती वैभव वोहरा, ऋषी कपूर, शिल्पा शेट्टी आणि तिचे आईवडील यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली होती.
शत्रुघ्न सिन्हा यांचा थोरला मुलगा कुशचे लग्न लंडनची रहिवासी असलेल्या तरुणा अग्रवालसोबत रविवारी मुंबईत धुमधडाक्यात झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोनाक्षीच्या भावाच्या लग्नात जमलेली सेलिब्रिटींची मांदियाळी...