(संगीत सेरेमनीमध्ये अनिल थडानीला भेटाताना रिचा चढ्ढा, रविना टंडन)
मुंबई- काल रात्री मुंबईमध्ये डिझाइनर मनीष मल्होत्रा यांची भाची रिध्दी मल्होत्रा आणि तेजस मल्होत्राच्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूडमधील अनेक प्रसिध्द सेलेब्सनी हजेरी लावली. शिल्पा शेट्टी, रविना टंडनसारख्या अनेक अभिनेत्रींनी
आपआपल्या पतीसोबत कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. तसेच, निर्माता करण जोहरसुध्दा आईसोबत पोहोचला होता.
सध्या शाहरुख आपल्या 'DDLJ'सिनेमाचे 1000 आठवडे पूर्ण झाल्याच्या सेलिब्रेशनमध्ये बिझी आहे. म्हणून गौरी एकटीला सेरेमनीमध्ये जावे लागले. सेरेमनीदरम्यान बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि गप्पा मारताना दिसले.
रिध्दी मल्होत्राने 'गोरी तेरे गाव मे' आणि 'आय हेट लव्ह स्टोरीज'सारखे सिनेमे दिग्दर्शित केलेल्या पुनीत मल्होत्राची बहीण आहे. 15 डिसेंबर रोजी रिध्दी आणि तेजस यांचे लग्न आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिध्दी-तेजसच्या संगीत सेरेमनीची काही इनसाइड छायाचित्रे...