आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 50व्या वर्षी गोविंदाने केला होता पुनर्विवाह, हे Celebsसुद्धा चढले होते पुन्हा बोहल्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी सुनीतासोबत लग्नाची विधी पूर्ण करताना गोविंदा)
सिनेस्टार गोविंदा 'किल दिल' आणि 'हॅपी एंडिंग' या सिनेमांमुळे चर्चेत आहे. याचवर्षी जानेवारी महिन्यात गोविंदाने त्याची पत्नी सुनितासोबत आपल्या संसाराला 25 वर्षे झाली म्हणून लग्नाचा वाढदिवस पुनर्विवाह करुन साजरा केला होता. हा सोहळा 14 जानेवारी रोजी निवडक नातलगांच्या उपस्थितीत झाला होता.
गोविंदाने पुनर्विवाह का केला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तेव्हा एका मुलाखतीत गोविंदाने पुनिर्विवाहाविषयी खुलासा केला होता. गोविंदाने सांगितले होते, की पुनर्विवाह करुन त्याने आपल्या स्वर्गवासी आईची इच्छा पूर्ण केली.
गोविंदाने सांगितले, माझ्या आईची इच्छा होती, की मी वयाची 49 वर्षे (21 डिसेंबर 1963) पूर्ण केल्यानंतर पत्नी सुनीतासोबत पुन्हा लग्न करावे. त्यामुळे लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही विधीवत विवाह केला.
1987 मध्ये केला होता गंधर्व विवाह
गोविंदाने सांगितले होते, "मार्च 1987मध्ये सुनीतासोबत माझा गंधर्व विवाह झाला होता. त्यामुळे यावेळी विधीवत आम्ही लग्न केले."
गोविंदाव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये काही सिनेमांत झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आणि सुपरस्टार शाहरुख खान यांनीही पुनर्विवाह केला होता.
एक नजर टाकुया, वीणा आणि शाहरुखने का केला होता पुनर्विवाह...