आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुख खानपासून ते राणी मुखर्जीपर्यंत, या सेलिब्रिटींना आहे स्मोकिंगची सवय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैधानिक इशारा - धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे. www.divyamarathi.com या बातमीच्या माध्यमातून फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्मोकिंग सवयीबद्दल सांगत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या ध्रूम्रपानाचे समर्थन करत नाही.
खरं तर स्टार आपला फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. हेल्टी डाएट, व्यायाम हा त्यांच्या रुटीनचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र काही वाईट सवयी अशा आहेत, ज्यापासून ते स्वतःला दूर करु शकलेले नाहीत. उदाहरणार्थ, अभिनेत्री तनुजा आपल्या स्मोकिंगच्या सवयीमुळे त्रासलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्या सिगारेट ओढताना कॅमे-यात कैद झाल्या होत्या.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसुद्धा चेन स्मोकर्सपैकी एक आहे. स्मोकिंगच्या सवयीमुळे अनेकदा तो वादात अडकला आहे. काही वर्षांपूर्वी जयपूरमधील एका क्रिकेट सामन्यादरम्यान शाहरुख स्टेडिअममध्ये स्मोक करताना आढळला होता.
शाहरुख खान, तनुजा यांच्याव्यतिरिक्त राणी मुखर्जीसह ब-याच स्टार्सना खासगी आयुष्यात सिगारेट ओढण्याची सवय आहे.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध सेलिब्रिटींबद्दल सांगत आहोत, जे फक्त पडद्यावरच नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातही मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढतात, तर काही सेलिब्रिटी ही सवय सोडण्यात यशस्वी झाले आहेत.
पुढे जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी...