आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities Who Are Separated But Not Yet Divorced

कायदेशीर घटस्फोट न घेताच विभक्त झाले हे सेलेब्रिटी कपल्स, कोण आहेत हे जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणधीर आणि बबिता कपूर, अनुराग कश्यप आणि कल्कि कोचलिन)

करिश्मा आणि करीना कपूरचे वडील आणि गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते रणधीर कपूर यांनी नुकतीच वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या रणधीर यांनी 'कल आज और कल', 'जवानी दीवानी', 'रामपुर का लक्ष्मण' आणि 'चाचा भतीजा' या सिनेमांचा समावेश आहे. रणधीर यांनी 6 नोव्हेंबर 1971 रोजी अभिनेत्री बबिता यांच्यासोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. करिश्मा आणि करीना या दोघीही बॉलिवूड अभिनेत्री आहेत. कपूर घराण्याचा सूनबाई झाल्यानंतर बबिता यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. त्यांनी दोन्ही मुलींच्या संगोपनाकडे लक्ष दिले. तर दुसरीकडे रणधीर यांना जडलेले दारुचे व्यसन आणि करिअरकडे केलेले दुर्लक्ष यामुळे बबिता आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. दोघांमध्ये वाढलेल्या मतभेदांमुळे करीनाच्या जन्मानंतर रणधीर आणि बबिता विभक्त झाले. मात्र अद्याप या दोघांचा घटस्फोट झालेला नाही.
बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलेले आहे, मात्र अद्याप त्यावर कायदेशीर मोहोर उमटलेली नाही. अर्थातच त्यांचा घटस्फोट झालेला नाही. अनुराग कश्यप-कल्कि कोचलिन, रणवीर शौरी-कोंकणा सेन, बॉबी मुखर्जी-महिमा चौधरीसह आणखी काही सेलिब्रिटी कपल्स असे आहेत, जे घटस्फोट न घेताच विभक्त झालेले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या सेलिब्रिटी कपल्सविषयी...