आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 29 तर कुणी 35, आजारपणाने या Celebsचा झाला अकाली मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता बाली गतकाळातील यशस्वी आणि चर्चेतील अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म 1930मध्ये झाला होता. गीता बाली यांनी वयाच्या 12व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 1950च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत शम्मी कपूर यांचेसुध्दा नाव सामील आहे. मात्र, खूप कमी वयातच आजाराने गीता यांचे निधन झाले. 21 जानेवारी रोजी गीता बाली यांची 50वी पुण्यतिथी होती. वयाच्या 35व्या वर्षीच गीता यांनी जगाचा निरोप घेतला.
गीता बालीचे चाहते होते शम्मी कपूर-
1955मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
लग्नानंतरही केले सिनेमे-
शम्मी कपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यासोबत काम केले होते. राज कपूर यांच्यासोबत त्या 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता यांनी शम्मी यांच्यासोबत लग्ने केल्यानंतरसुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. त्यांचा शेवटचा सिनेमा 1963मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता.
आजारामुळे झाले निधन-
1965मध्ये समॉल पॉक्समुळे गीता बाली यांचे अकाली निधन झाले. यावेळी त्या एका पंजाबी सिनेमाचे शूटिंग करत होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काही बॉलिवू़ड स्टार्सविषयी ज्यांचे निधन आजारामुळे झाले...