आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीपासून ते नीना-सारिकापर्यंत, लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्या होत्या या अभिनेत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अभिनेत्री श्रीदेवी)
सध्या बॉलिवूडच्या गल्लीबोळात अभिनेत्री राणी मुखर्जी प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. राणीने दिग्दर्शक आदित्य चोप्रासह 21 एप्रिल 2014 रोजी इटलीत गुपचुप लग्न थाटले. लग्नानंतर राणी दोनदाच मीडियासमोर आली. यावेळी तिला बघता ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज बांधला गेला. आता राणी खरंच प्रेग्नेंट आहे की नाही, हे येणा-या दिवसांत स्पष्ट होईलच.
ब-याचदा अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नेंसीची गोष्ट लपवण्यासाठी गुपचुप लग्न थाटल्याची अनेक उदाहरणे बॉलिवूडमध्ये आहेत. भलेही, लग्नापूर्वी प्रेग्नंट होणे हे आपल्या समाजात चुकीचे मानले जाते. मात्र लाखो-करोडो हृदयावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सेलिब्रिटींना यामुळे काहीही फरक पडत नाही. बॉलिवूडमध्ये लग्नापूर्वी दिवस गेलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. यामध्ये श्रीदेवीपासून ते कोंकणा सेन शर्मा, सारिका या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, ज्या
लग्नापूर्वीच प्रेग्नंट राहिल्या होत्या.
श्रीदेवी कपूर
खरे पाहता अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नसीबद्दल कुणाला कळू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र श्रीदेवी कधीही ही गोष्ट लपवून ठेवली नाही. श्रीदेवीने ती सात महिन्यांची प्रेग्नंट असताना बोनी कपूरबरोबर लग्न केले होते. 1996 मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यातच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा अभिनेत्रींविषयी ज्यांना लग्नापूर्वीच दिवस गेले होते...