आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebrities Who Got Threat Calls From Underworld

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलशन कुमार यांना गमवाला लागला होता जीव, हे सेलिब्रिटीसुद्धा होते डॉनच्या निशाण्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडियाचे वडील नुस्ली वाडिया यांना अंडरवर्ल्डकडून धमकीचे फोन आले आहेत. या फोन कॉल्सनंतर नुस्ली वाडिया यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणाला नवीन वळण प्राप्त झाले आहे.
तसे पाहता यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींना अंडरवर्ल्डकडून अशी धमकी मिळाली आहे. यामध्ये सलमान खानपासून ते अक्षय कुमार, राकेश रोशन यांच्यासह ब-याच सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.
नव्वदच्या दशकात कॅसेट किंग म्हणून ओळखले जाणारे गुलशन कुमार यांची अंडरवर्ल्डच्या लोकांनी हत्या केली होती. 12 ऑगस्ट 1997 रोजी अंधेरी पश्चिम येथील एका मंदिराबाहेर तीन हल्लेखोरांनी गुलशन कुमार यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची हत्या केली होती. गुलशनकुमार यांच्या हत्येचा कट कुख्यात गुंड अनीस इब्राहिम याच्या दुबईतील कार्यालयात शिजला होता. त्यात कयूमसह सालेम आणि फरारी आरोपी व संगीतकार नदीम सैफी हेही सहभागी झाले होते. गुलशन कुमार यांची हत्या व्यावसायिक वादातून करण्यात आली होती. तसेच रमेश तौरानी यांनी कुमार यांच्या हत्येसाठी सालेमला 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती, असा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता.
तर अलीकडच्या काळात गायक सोनू निगमला छोटा शकीलकडून धमकीचे कॉल्स आले होते. एका मॅनेजमेंट कंपनीशी असलेला करार मोडण्यास त्याला सांगण्यात आले होते. यासंदर्भात सोनूने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. .
या पॅकेजच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला यापूर्वी कोणकोणत्या सेलिब्रिटींना आपल्या प्राणाला मुकावे लागले आणि कोणकोणत्या सेलिब्रिटींवर जीवघेणे हल्ले झाले, हे सांगत आहोत...