आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा घेणार मुलीला दत्तक, या 12 अभिनेत्रींनीसुद्धा मुलांना दत्तक घेऊन अनुभवला मातृत्वाचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात मनीषा कोइराला आणि दुसरीकडे रवीना टंडन)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोइरालाने पुढील वर्षी एका मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका कार्यक्रमादरम्यान मनीषाने आपली ही इच्छा बोलून दाखवली. मनीषाने सांगितले, ''मी एका मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मला हवी तशी मी कुटुंबाला सुरुवात करणार आहे.''
मनीषाने पुढे सांगितले, ''मला गर्भाशयाचा झालेला कॅन्सर आता पुर्णपणे बरा झाला आहे. मात्र मला तीन वर्षे काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. मला आजारपणातून पूर्णपणे बरे होऊन पुढील वर्षी तीन वर्षे होणार आहेत. आता मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करु इच्छिते. त्यामुळे आता अधिकृतरित्या मी एका मुलीला दत्तक घेत आहे.''
तसे पाहता बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी मुलांना दत्तक घेऊन मातृत्वाचा आनंद अनुभवला आहे. त्यांनी मुलांना जन्म दिला नाही, मात्र या मुलांना त्यांनी आईचे भरभरुन प्रेम दिले आणि सर्व कर्तव्ये पार पाडली.
सुश्मिता सेन 2 मुलींची तर प्रिती झिंटा 34 मुलींची आई असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? या दोन्ही अभिनेत्रींनी लग्न केले नाही, मात्र मुलींना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अशा मातांविषयी..