आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरा-दिलीप यांच्यातच नव्हे, या कपल्सच्या वयातदेखील आहे तब्बल 12 ते 24 वर्षांचे अंतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - दिलीप कुमार आणि सायरा बानो)
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांनी आज (जन्म 23 ऑगस्ट 1944) आपल्या वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. याकाळात मोठ्या पडद्यापासून लांब असलेल्या सायरा यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते.
सायरा यांनी 1966मध्ये वयाच्या 22 वर्षी दिलीप कुमार यांच्यासह लग्न केले. त्यावेळी दिलीप साहेब आणि सायरा बानो यांच्या लग्नाची बातमी सर्वांना अचंबित करणारी होती. याचे कारण होते सायरा आणि दिलीप साहेब यांच्या वयात असलेले अंतर. सायरा दिलीप साहेबांपेक्षा पाच किंवा दहा नव्हे तर तब्बल 22 वर्षांनी लहान आहेत. सायरा बानो यांच्या जन्माच्या वेळी दिलीप साहेबांनी 'ज्वारा भाटा' (1944) या सिनेमाद्वारे फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. सायरा यांच्यासह लग्नाच्या वेळी दिलीप साहेब 44 वर्षांचे होते.
तसे पाहता कमी वयाच्या मुलीसह लग्न करणारे दिलीप साहेब पहिले सेलिब्रिटी नाहीयेत. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांच्यापेक्षा दहा ते पंधरा वर्षे लहान मुलीसह लग्न थाटले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा स्टार कपल्सविषयी..