आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभय देओलच नव्हे, हे स्टार्ससुध्दा पडले आहेत अर्थिक संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अभय देओल सध्या अर्थिक तंगीने त्रस्त आहे. त्याचा मागील काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'वन बाय टू' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. बातमी अशीही आहे, की त्याची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, या वाईट परिस्थित त्याची गर्लफ्रेंड प्रिती देसाईनेसुध्दा त्याची साथ सोडली आहे.
अभयने 'वन बाय टू' या सिनेमात काम केले होते सोबतच त्याने सिनेमासाठी पैसादेखील लावला होता. सिनेमात पैसा लावण्यासाठी त्याने बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे त्याने मुंबईच्या जुहू परिसरातील पांडुरंग को-ऑपरेटिंग हाउसिंग सोसायटीचा फ्लॅट आणि काही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती. त्याचा सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याच्याकडे सध्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत. बँकेने त्याला या संदर्भात नोटिससुध्दा पाठवली आहे.
'वन बाय टू'चा एकुण खर्च 8 कोटीच्या जवळपास झाला होता. 31 जानेवारी 2014ला रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात केवळ 2.8 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्याच्या मालमत्तेचा लिलाव होऊ शकतो. त्याच्या जुहू परिसरातील फ्लॅटची किंमत 2-3 कोटी असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्याला याव्यतिरिक्त आणखी काही पैसे जमवावे लागणार आहे.
'वन बाय टू' सिनेमाविषयी माहिती
दिग्दर्शक - देविका भगत
निर्माता - अमित कपूर, अभय देओल, संजय कपूर
कलाकार - अभय देओल, प्रीति देसाई, रति अग्निहोत्री
म्यूजिक - शंकर एहसान लॉय
अभय असा एकमेव स्टार नाहीये जो अर्थिक तंगीने त्रस्त आहे. यापूर्वीही बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सचे दिवाळे निघाले आहे. या यादीत अमिताभ बच्चन आणि राज कपूरसारख्या दिग्गज स्टार्सचासुध्दा सामावेश आहे. तेसुध्दा अर्थिक तंगीला सामोरे गेले आहेत. परंतु त्यातील काही स्टार्सनी कष्ट आणि संघर्ष करणे न थांबवता आपले ध्येय गाठले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशा स्टार्सविषयी ज्यांनी अर्थिक तंगी बघितली आहे...