बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी प्रिती झिंटा 1 जानेवारी रोजी 40 वर्षांची झाली. प्रिती दिर्घकाळापासून सिनेमांमध्ये दिसली नाही. परंतु लवकरच तिचा 'भैय्याजी सुपरहिट' सिनेमा रिलीज होणार आहे. 1998मध्ये
शाहरुख खानसोबत 'दिल से' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी प्रिती काही दिवसांपूर्वी 'इश्क इन पॅरिस' सिनेमात झळकली होती. मात्र तिचा हा सिनेमा फ्लॉप ठरला.
प्रितीचे चर्चेतील सिनेमे-
दिल से (1998), सोल्जर (1998), संघर्ष (1999), क्या कहना, हर दिल जो प्यार करेगा (2000), चोरी चोरी चुपके-चुपके, दिल चाहता है, (2001), दिल है तुम्हारा (2002), द हीरो, कोई मिल गया, कल हो ना हो (2003), लक्ष्य, दिल ने जिसे अपना कहा, वीर-जारा (2004), सलाम नमस्ते (2005), कभी अलविदा ना कहना, जान-ए-मन (2006), झूम बराबर झूम (2007), हिरोज (2008), इश्क इन पॅरिस (2013)
आयपीएल आणि प्रॉडक्शनमध्ये आजमावले नशीब-
आयपीएलमध्ये (किंग्स इलेव्हन वन पंजाबची मालकिन) खरेदी केल्यानंतर प्रिती हळू-हळू सिनेमांपासून दूर गेली. या कामात तिच्यासोबत माजी बॉयफ्रेंड उद्योगपती नेस वाडियाने साथ दिली होती. 2013मध्ये प्रिती निर्माती बनली आणि तिने 'इश्क इन पॅरिस' सिनेमाची निर्मित केली.
नेस वाडियासोबतच्या नात्याचा झाला वाईट अंत-
2005मध्ये प्रिती उद्योगपती नेस वाडियाच्या रिलेशनशिपने चर्चेत आली होती. सांगितले जाते, की प्रितीने सिनेमांत काम करून नये अशी नेस वाडियाची इच्छा नव्हती. नेसच्या म्हणण्यावरून प्रितीने आयपीएलची टीम खरेदी केली होती. 2009मध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांचे नाते संपुष्टात आले. नेस आणि प्रिती यांच्या नात्याचा शेवट होण्यामागे नेसची आई असल्याचे सांगितले गेले होते. नेसच्या आईंना दोघांचे नाते पसंत नव्हते. मे 2014मध्ये नेस आणि प्रिती यांचे ब्रेकअपने पुन्हा एकदा चर्चेत आले होते. यावेळी प्रितीने नेसवर छेडछाड केल्याचा आरोप लावला होता.
काय झाले होते 30 मे 2014 रोजी-
व्हीआयपी बॉक्समध्ये सीटवरून नेस आणि प्रितीमध्ये वाद झाला होता. नेसच्या आईंना बसण्यासाठी जागा नव्हती, म्हणून तो स्टाफवर भडकला. प्रितीने नेसला शांत राहण्यास सांगितले तेव्हा नेसने प्रितीसोबत अभद्र भाषत बातचीत केली.
प्रिती आणि नेस यांची लव्हस्टोरी या वादापूर्वी संपलेली होती. परंतु या वादानंतर दोघांचे नाते आणखीच बिघडले. दोघे एकमेकांना पाहणेदेखील पसंत करत नाहीत.
केवळ नेस आणि प्रितीच नव्हे बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी असे आहेत, जे एकेकाळी एकमेकांना जोडीदाराच्या रुपात पाहत होते, मात्र आता एकमेकांना पाहणेदेखील पसंत करत नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही सेलेब्सविषयी...