बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांसाठी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश घेणे आणि येथे यशस्वी होणे तसे पाहता सोपे असते. मात्र काही सेलिब्रिटींच्या मुलांनी फिल्मी दुनियेची निवड न करता वेगळ्या करिअरमध्ये यश मिळवले आहे.
यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो महानायक
अमिताभ बच्चन यांच्या मुलीचा.
बिग बींची लाडकी लेक श्वेता नंदाने सिनेमांत काम करण्यात कधीही रुची दाखवली नाही. तर श्वेताने एक न्यूज अँकर म्हणून काम केले आहे. इंडियन न्यूज चॅनल सीएनएन आयबीएनसाठी सिटी जर्नलिस्ट आणि एनडी टीव्ही प्रॉफिटसाठी अँकर म्हणून श्वेताने काम केले आहे. उद्योगपती निखिल नंदासह लग्न करणा-या श्वेताने 2005-06मध्ये मॉडेलिंगसुद्धा केली होती.
आपण कधीही अभिनय करु शकत नाही, असे श्वेताला वाटत होते. त्यामुळे ती कधीही फिल्मी दुनियेकडे वळली नाही. मात्र लंडनमध्ये शिकत असलेली आपली मुलगी नव्या नवेलीने सिनेमांत काम करावे, अशी श्वेताची इच्छा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही स्टार किड्सविषयी...