आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TOP 20: कुणाचे झाले लग्न तर कुणाचे ब्रेकअप, हे सेलेब्स राहिले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - सैफ अली खान आणि करीना कपूर)
आज आपल्या समाजात लिव्ह इन रिलेशनशिप सामान्य बाब झाली आहे. असे म्हटले जाते, की बॉलिवूडमध्ये राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह इन रिलेशनशिपला सुरुवात केली. तसे पाहता स्टार्सचे खासगी आयुष्य नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. त्यामुळे हे कलाकार कुणासोबत डेट करतात, कुठे फिरतात, कुणासोबत राहात आहेत, या सर्वांची बरीच चर्चा रंगत असते.
ऐंशीच्या दशकात मात्र लिव्ह इनमध्ये राहणे हे मोठे धाडसी पाऊल होते. राज बब्बर यांनी समाजाच्या सर्व बंधनांना झुगारुन स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडस दाखवले. यामुळे त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. काही दिवसांनी राज आणि स्मिता यांनी लग्नदेखील केले.
आताच्या काळात तर बॉलिवूडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता तर काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
आज आम्ही तुम्हाला लिव्ह-इनमध्ये राहणा-या आणि पूर्वी राहत असलेल्या बी टाऊनच्या स्टार्सबद्दल सांगतोय.
करीना कपूर आणि सैफ अली खान
करीना कपूर खानची बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी गणना होते. लग्नापूर्वी करीना सैफसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनी आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबूली दिली. लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी सैफने करीनाच्या आईकडे परवानगी मागितली होती. करीनाच्या आईने परवानगी दिल्यानंतर हे दोघे काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले आणि ऑक्टोबर 2012मध्ये लग्नबेडीत अडकले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी कोणकोणते स्टार्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा होते...