आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebrity Couples Who Dragged Their Partners In Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ प्रितीच नव्हे, आजवर अनेक Celebsनी मीडियात आपल्या जोडीदाराचे नाव केले बदनाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : प्रिती झिंटा आणि नेस वाडिया)

मुंबई - प्रिती जिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील वाद सध्या बराच चर्चेत आहे. 13 जून रोजी प्रितीने नेसच्या विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली होती. त्यात प्रितीने नेसवर छेडछाडीचा आरोप केला होता. ही एफआयआर दाखल केल्यानंतर ती अमेरिकेला निघून गेली होती आणि त्यामुळे पोलिसांना तिची साक्ष घेता आली नव्हती. शेवटी पोलिसांनी बोलावल्यानंतर रविवारी दुपारी ती मुंबईला परत आली आहे.
प्रितीने अजून पोलिसांना कोणतीही साक्ष दिली नसली तरीही मिडीयात तिच्या आणि नेसच्या वादाबद्दल खुप काही लिहिण्यात आले. स्वतः प्रितीने मीडियात जाहीर केले की, "नेसने मला धमकी देत सांगितले, की तो मला गायब करून टाकेल. तो मला हे पण म्हणाला की तो एक शक्तीशाली माणूस आहे आणि मी त्याच्यासमोर काहीच नाही. वानखेडे स्टेडियमवर घडलेल्या या घटनेने मला चांगलाच धक्का बसला आहे आणि मी घाबरले आहे."
पोलिसांनी नेस वाडीयाच्या विरोधात भांदवी कलम 354 (महिलांवर हिंसात्मक हल्ला), 504 (शांतिभंग करण्यासाठी मुद्दाम अपमान करून उकसवणे), 506 (आपराधिक धमकी देणे) आणि 509 (शब्द, खुणा आणि वागणुकीतून महिलेच्या चारित्र्यावर हल्ला) या कलमांतर्गत खटला दाखल केला.
प्रितीने एफआयआरमध्ये सांगितले आहे, "तो माझ्या खुर्चीजवळ आला आणि सगळ्यांसमोर माझ्यावर ओरडायला लागला. त्याने अपशब्द वापरले, ज्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे."
प्रिती आणि नेस वाडीया यांच्यात पाच वर्ष प्रेमसंबंध होते. त्यांचा साखरपुडादेखील झाला होता. 2009 साली त्यांचं ब्रेकअप झालं होतं. नेसच्या आईचा या नात्याला विरोध आहे असं म्हटलं जातं.

असं पहिल्यांदा नाही झालंय, जेव्हा एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीने आपल्या जोडीदाराला मिडीयात ओढलंय. प्रिती आणि नेसच्या आधीही अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या पॅकेजमधून अशाच काही प्रकरणांवर नजर टाकुया...