आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Height Looks So Small Some Elderly, Here Bollywood 'odd Couples'

कुणी दिसतात म्हातारे तर कुणी आहेत उंचीने लहान, हे आहेत Bollywoodचे 'हटके कपल्स'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती जय मेहतासोबत जुही चावला)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. जुहीने सध्या सिनेमांमध्ये काम करणे कमी केले असले तरीदेखील तिने येथे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. मात्र तिचा विनोदी आणि खोडकरपणा असलेल्या भूमिका चाहत्यांना विशेष भावल्या.
जुही चावलाने अगदी साधारण चेहरा असलेले बिझनेसमन जय मेहतांसोबत लग्न केले. खरे तर जुही आपल्या जोडीदाराच्या रुपात एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याची निवड करुन त्याच्यासोबत संसार थाटू शकली असती. मात्र तिने तसे न करता दुस-या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अगदी साधारण चेह-याच्या व्यक्तीची निवड जोडीदाराच्या रुपात केली. जय मेहतांसोबत लग्न झाल्यानंतर तिने सिनेमांपासून काही काळ ब्रेक घेतला. जुही आणि जय या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे नाव जान्हवी असून तिचा जन्म 2001मध्ये झाला. तर मुलगा अर्जुनचा जन्म 2003 मध्ये झाला.
जुहीला आपल्या खासगी आयुष्याविषयी मीडियात बोलणे पसंत नाहीये. तिने आपले लग्न लो-प्रोफाइल ठेवले. तिच्या कुटुंबाची फार कमी छायाचित्रे मीडियात प्रकाशित झाली आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत, ज्यांचे पार्टनर त्यांच्या तुलनेत फिके पडतात. काहींची उंची आपल्या पत्नीपेक्षा कमी आहे, तर काही अभिनेत्री आपल्या पतीच्या वयापेक्षा जास्त वयाच्या दिसतात. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास, त्यांची जोडी विचित्र दिसते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच काही कपल्सविषयी..