आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-ऐश्वर्या, जॉन-बिपाशासह बी टाऊनच्या या फेमस जोड्या आता एकत्र दिसणे नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते देव आनंद आणि गायिका-अभिनेत्री सुरैया यांची लव्ह स्टोरी आजही स्मरली जाते. ही गतकाळातील ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन हिट जोडी होती. दोघांनी जवळजवळ सहा सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते.
यामध्ये विद्या (1948), साहिर (1949), जीत (1949), नीली (1950), सनम (1951), दो सितारे (1951) या सिनेमांचा समावेश आहे. मात्र खासगी आयुष्यात ही जोडी तुटल्यानंतर पुन्हा कधीही पडद्यावर एकत्र दिसली नाही.
या लव्ह स्टोरीचा दुःखद अंत झाला होता. सुरैयाच्या आजीने त्यांच्या लग्नाला नकार दिल्यानंतर त्यांनी देव आनंद यांच्या आयुष्यातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे देव आनंद खूप खचले होते.
हे नाते संपुष्टात आल्यानंतर देव आनंद यांनी को-स्टार कल्पना कार्तिकसोबत लग्न केले होते, तर सुरैया आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्या ख-या आयुष्यात नातेसंबंध तुटल्यानंतर त्यांनी कधीही पुन्हा एकत्र काम केले नाही. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन.
सलमान खान-ऐश्वर्या राय बच्चन
1999 मध्ये रिलीज झालेल्या 'हम दिल द चुके सनम' सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान ऐश्वर्या आणि सलमान यांच्यात सूत जुळले होते. जवळजवळ दोन वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिनवरील हे सर्वात चर्चित कपल होते. परंतु काही कारणास्तव यांचे नाते टिकू शकले नाही. या दोघांमध्ये एवढा दुरावा निर्माण झाला, की कधी हे दोघे समोरासमोरसुद्धा आले नाहीत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही जोड्यांविषयी..