(गेल्यावर्षी करण्यात आलेल्या महाअभिषेकाचा फाइल फोटो)
पुणे - कलाक्षेत्राची समृध्दी आणि जागतिक सुख-शांततेसाठी मराठी आणि हिंदी सिनेस्टार्स सोमवारी (1 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला महा-अभिषेक करणार आहेत. 'सलाम पुणे'च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलावंत या महाअभिषेक आणि महाआरतीमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती 'सलाम पुणे'चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून खासदार संजय काकडे आणि विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
अशा महाअभिषेक आणि महाआरतीचे मागील वर्षीदेखील आयोजन करण्यात आले होते. यावर्षी हिंदी अभिनेता यशपाल शर्मा, राजपाल यादव, मुकेश तिवारी यांची उपस्थिती राहणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील लीला गांधी, मधु कांबीकर, ज्योती चांदेकर, सुहसिनी देशपांडे, पुष्कर जोग, जयमाला इनामदार, तेजिस्विनी पंडित, अशोक शिंदे, श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, पूजा पुरंदरे, गौरी गाडगीळ, वृंदा बाळ, राधा कुलकर्णी, अभिजित खांडकेकर, प्रतीक्षा जाधव, प्रीतम कागणे, माधवी सोमणे, मोहिनी कुलकर्णी, प्रियांका पवार, गौरी र्कोगे, अनंत जोग, संतोष जुवेकर,अनिकेत विश्वासराव, प्रवीण तरडे, उदय टिकेकरस हेमंत ढोमे, उमेश दामले, देवेंद्र भगत, गौरव घाटणेकर, संकेत मोरे, राहूल डोंगरे, सचिन गवळी, निरंजन नामजोशी, संग्राम सरदेशमुख, दिग्दर्शक महेश लिमये यांच्यासह अनेक कलावंत या महायज्ञामध्ये सहभागी होणार आहेत.