(डावीकडून- राखी सावंत, मलायका अरोरा आणि ईशा देओल)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर मलायका अरोरा खानने नुकतेच पाठीवर आणखी एक टॅटू गोंदवून घेतले. यापूर्वीसुध्दा तिने शरीरावर दोन टॅटू गोंदवलेले आहेत. त्यामधील एक टॅटू तिच्या हातावर दिसते. तसेच, दुसरे टॅटू तिच्या पाठीवर आहे.
मलायकाच्या नवीन टॅटूमध्ये तिन विविध प्रकारचे उडणारे पक्षी दिसून येत आहेत. नवीन टॅटू गोंदवून घेताना तिने काही छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्ट केली आहेत. सोबतच, तिने ही छायाचित्रे इंस्टाग्रामवरदेखील शेअर केली आहेत. फोटो पोस्ट करून मलायका लिहिते, "#tatoo no 3....,,free as a bird or should I say birds.love wat they signify".
तसे पाहते, बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये टॅटूची क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या अभिनेत्री टॅटू चाहत्यांना दिसावे असे गोंदवून घेतात. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, ईशा देओल, कंगणा राणावत, आलिया भट्ट, राखी सावंतसारख्या अभिनेत्रींनी शरीरावर टॅटू गोंदवून घेतले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिनेत्रींनी शरीरावर कुठे गोंदवून घेतले आहेत टॅटू...