आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देख तमाशा देख'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले अनेक सेलेब्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी (15 एप्रिल) फिरोज अब्बास खान दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'देख तमाशा देख' सिनेमाचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. सिनेमाच्या खास स्क्रिनिंगमध्ये सिनेमाच्या स्टार्सव्यरितिक्त अनेक सेलेब्स पोहोचले होते.
कोण-कोणत्या स्टार्सनी लावली हजेरी?
सतीश कौशिक, अरबाज बजवा, सुलभा आर्या, पामिला चोप्रा, इंद्र कुमार, तन्वी आज्मी, जयंतीलाल गाडा, प्रसून जोशीसह अनेक सेलेब्स 'देख तमाशा देख'च्या खास स्क्रिनिंगमध्ये पोहोचले होते.
या सिनेमाची कहाणी सत्य घटनेवर आधारित एक राजकिय व्यंग्य आहे. फिरोजने काही वर्षांपूर्वी 'गांधी माई फादर'मधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्याच्या या सिनेमाची सर्वत्र प्रशंसा झाला होती.
'देख तमाशा देख'मध्ये सतीश कौशिक आणि गणेश यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
अलीकडेच फिरोजने आपल्या आगामी सिनेमाविषयी सांगितले, 'या सिनेमात दाखवलेल्या घटना सत्य आहेत. काही वर्षांपूर्वी मला एका निवृत्त पोलिस कर्मचा-याने ही कहाणी सांगितली होती. त्या कहाणीने मला विचार करायला भाग पाडले. जेव्हा मी माझा पहिला सिनेमा तयार केला तेव्हा या कहाणीवर सिनेमा बनवण्याचा विचार एकसारखा माझ्या डोक्यात घोळत होता. कहाणीपासून प्रेरित होऊ मी हा सिनेमा बनवला.'
फिरोज अब्बास असेही म्हणतो, की हा सिनेमा बनवल्यानंतर मी चिंतामुक्त झालो आहे.
'देख तमाशा देख'ला फिरोज अब्बासने सुनील ए. लुल्ला यांच्यासोबत मिळून निर्मित केले आहे. त्याचा हा सिनेमा 18 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'देख तमाशा देख'च्या खास स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेबासची काही छायाचित्रे...