आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेमिना मिस इंडियाच्या ग्रॅण्ड फिनालेत सेलेब्सची मांदियाळी, बघा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 5 मार्च रोजी फॅशन विश्वात मानाच्या मानल्या जाणार्‍या ’फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2014’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील यशराज स्टुडिओत हा कार्यक्रम पार पडला. या चुरशीच्या स्पर्धेत जयपूरच्या कोयल राणा हिने बाजी मारली. त्यापाठोपाठ मुंबईच्या झटालेखा मल्होत्रा आणि गोव्याच्या गेल डिसिल्व्हा यांनी यश मिळवले. गतविजेती ’फेमिना मिस इंडिया’ नवनीत कौर ढिल्लोने कोयल राणाला मिस इंडिया वर्ल्डचा मुकूट घातला.
या कार्यक्रमात बी टाऊनच्या सेलिब्रिटींची मांदियाळी बघायला मिळाली. अभय देओल, जॅकलिन फर्नांडिस, विद्युत जामवाल, अदिति राव हैदरी, मलाइका अरोरा, मनीष मल्होत्रा, यो यो हनी सिंह, मेगन यंग आणि बॉक्सर विजेंदर सिंह या स्पर्धेचे परीक्षक होते. ग्रॅण्ड फिनालेच्या संध्याकाळी या स्टार परीक्षकांनी रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते.
बी टाऊनच्या सेलेब्सची जमली मांदियाळी...
फेमिना मिस इंडियाच्या ग्रॅण्ड फिनालेत बॉलिवूडचे अनेक सेलेब्स जमले होते. शाहिद कपूरने आपल्या रॉकिंग परफॉर्मन्सने सर्वांची मनं जिंकली. तर हनी सिंह आणि मीकासिंग यांच्या गाण्यांनी उपस्थितांना थिरकायला भाग पाडले. यावेळी श्रद्धा कपूरनेही परफॉर्म केले. तर सोनाक्षी सिन्हा झीनत अमानच्या गाण्यांवर थिरकली. यावेळी झीनत अमान यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फेमिना मिस इंडियाच्या ग्रॅण्ड फिनालेत आलेल्या सेलेब्सचे खास PIX...