आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'PK\'ने आतापर्यंत कमावले 294 कोटी, Success Partyमध्ये दिसले सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमिर खान, किरण राव आणि करण जोहर)
मुंबई- आमिर खान अभिनीत 'पीके' भारतात बॉक्स ऑफिसवर सर्वाधित जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 294 कोटींचा बिझनेस केला आहे. आपल्या सिनेमाला मिळालेले यश आमिर खानने संपूर्ण टीमसोबत उत्साहात साजरे केले. शनिवारी (3 जानेवारी) रात्री या आनंदाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये निर्मिता करण जोहर, सिध्दर्थ रॉय कपूर, आमिर कपूर आणि पत्नी किरण राव, राजकुमार हिराणी आणि प्रसून जोशीसह अनेक बॉलिवूड सेलेब्स सामील झाले होते.
'पीके' दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा सिनेमा असून त्यात आमिर खानशिवाय अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, संजय दत्त, बोमन इराणी आणि सौरभ शुक्ला यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सिनेमावर मागील काही दिवसांपासून धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप लागले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'पीके'च्या सक्सेस पार्टीमध्ये सामील झालेल्या सेलेब्सची काही छायाचित्रे...