आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या नातवाच्या लग्नात पत्नी-मुलासोबत पोहोचला सोनू निगम, दिसले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्मिता ठाकरे यांच्या सोबत सोनू निगम, त्याची पत्नी मधुरिमा आणि मुलगा नवीन, डावीकडे- अभिनेता जॅकी श्रॉफ)
मुंबईः शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू राहुल ठाकरे आणि अदिती रेडेकरचा लग्नसोहळा सोमवारी वांद्रे येथील एमसीए लॉनवर नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील स्टारमंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गायक सोनू निगम पत्नी मधुरिमा आणि मुलगा नवीनसोबत लग्नात सहभागी झाला होता. अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीही लग्नात हजेरी लावून नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिनेता अर्जुन रामपाल पत्नी मेहेरसोबत लग्नात सहभागी झाला होता.
राहुल ठाकरेची आई स्मिता ठाकरे या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी किससे कहें (2007), हसीना मान जाएगी (1999), हम जो कह न पाए (2005) आणि सोसायटी काम से गई (2011) या हिंदी सिनेमांची निर्मिती केली आहे.
राहुल दिग्दर्शक आहे. त्याने 'राडा रॉक्स' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 2011 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्मिता ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...