आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रॉय'च्या स्क्रिनिंगला पत्नी-मुलींसोबत पोहोचला अर्जुन, रणबीरच्या आईवडिलांनी पाहिला सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी आणि मुलींसोबत अभिनेता अर्जुन रामपाल)
मुंबईः गुरुवारी मुंबईतील लाइटबॉक्स थिएटर आणि सनी सुपर साऊंड स्टुडिओ या दोन ठिकाणी 'रॉय' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. लाइटबॉक्समध्ये आयोजित स्क्रिनिंगला अभिनेता अर्जुन रामपलाल पत्नी मेहर जेसिया आणि दोन्ही मुलींसोबत पोहोचला होता. तर सनी सुपर साऊंड स्टुडिओत ठेवण्यात आलेल्या स्क्रिनिंगमध्ये रणबीर कपूरचे आईवडील नीतू आणि ऋषी कपूर सहभागी झाले होते.
याशिवाय दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्यांची गर्लफ्रेंड प्रज्ञा, प्रेम चोप्रा, रणधीर कपूर, अनू दीवान आणि तिचे पती सनी दीवान यांच्यासह बरेच सेलिब्रिटी 'रॉय' बघायला आले होते.
'रॉय' हा सिनेमा आज रिलीज झाला असून या सिनेमाद्वारे विक्रमजती सिंह दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. सिनेमात रणबीर कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्जुन रामपाल मेन लीडमध्ये आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'रॉय'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...