आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: सई-राधिका स्टारर \'हंटर\'च्या स्क्रिनिंगला पतीसोबत दिसली सुनिधी चौहान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[सई ताम्हणकर, पती हितेश सोळंकीसह सुनिधी चौहान, आयुष्मान खुराना-सिद्धार्थ मल्होत्रा, राधिका आपटे]
मुंबईः या शुक्रवारी रिलीज होणा-या आगामी 'हंटर' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग रविवारी मुंबईत ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सिद्धार्थ मल्होत्रा, सुनिधी चौहान आणि तिचे पती हितेश सोळंकी, गुलशन देवाशीष, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, हेजल कीच, सई ताम्हणकर, राधिका आपटे, डेविड धवन आणि आयुष्मान खुराणासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.
'हंटर' या सिनेमाचे दिग्दर्शक प्रज्वल जोशी असून अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल, कृती नाखवा, रोहित चुगनी आणि केतन मेरु यांनी एकत्रित येऊन प्रोड्यूस केला आहे. या सिनेमात दोन मराठमोळ्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आम्ही बोलतोय ते सई ताम्हणकर आणि राधिका आपटे यांच्याविषयी. सई आणि राधिकासह गुलशन देवाशीष आणि सागर देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका सिनेमात आहेत. येत्या 20 मार्च रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हंटर'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक....