आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LFWच्या अनाऊंसमेंटवेळी दिसला अभिनेत्रींचा ग्लॅमरस LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(LFW इव्हेंटच्या अनाऊंसमेंटमध्ये अभिनेत्री किआरा अडवाणी, दीक्षा सेठ आणि श्रेया सरन)
मुंबई - भारतातील प्रसिद्ध फॅशन ट्रेंड इव्हेंट म्हणून ओळखला जाणारा लॅक्मे फॅशन वीक यावर्षा पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने या इव्हेंटमध्ये सहभागी होणा-या 98 स्पर्धकांच्या नावाची घोषणा सोमवारी करण्यात आली. याशिवाय 13 स्पॉन्सर कंपन्यांचीसुद्धा निवड करण्यात आली.
2014मध्ये होणा-या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान रॅम्पवर कॅटवॉक करताना दिसणार आहे. डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोची की शोस्टॉपर असणार आहे. याविषयी मनीष मल्होत्रा म्हणाले, की मला नेहमीपासूनच करीनासह काम करणे पसंत आहे. ती सुंदर तर आहे, पण त्यासोबतच तिच्यात आत्मविश्वाससुद्धा आहे.
यावेळी इव्हेंटमध्ये सहभागी होणा-या अभिनेत्री आणि मॉडेल्ससुद्धा हजर होत्या. यामध्ये श्रेया सरन, गौहर खान, कोंकणा सेन शर्मा, किआरा अडवाणी, दीक्षा सेठ यांच्या नावाचा समावेश होता.
लॅक्मे फॅशन 2014 चे आयोजन 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्टच्या दरम्यान करण्यात येणार आहे. मुंबईतील हॉटेल पॅलेडियममध्ये हा सोहळा रंगणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटच्या अनाऊंसमेंट कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलेब्सची झलक...