आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: 'एक व्हिलन' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील, सक्सेस पार्टीत पोहोचले सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एक व्हिलन'च्या सक्सेस पार्टीत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, प्राची देसाई आणि आलिया भट्ट
मुंबई: मोहित सूरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सिनेमाने आतापर्यंत 103 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिनेमाच्या यशानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बी-टाऊनच्या सेलेब्सनी उपस्थिती लावली होती.
सिनेमा बालाजी मोशन पिक्चर्सचा असल्याने जितेंद्र आणि तुषार, एकता कपूर यांची उपस्थिती होती. त्यांच्यासह करण जोहर, राजकुमार राव, महेश भट्ट, मुकेश भट्ट, वरुण धवन, सोफी चौधरी, प्राची देसाई, उदिता गोस्वामी, नंदिता महतानी, हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा, तब्बू, आलिया भट्ट, पत्रलेखासुध्दा सामील झाली होती. रविना टंडन पती अनिल थडानीसह पोहोचली होती. सिनेमामध्ये कार करणारा रितेश देशमुख, सिध्दार्थ मल्होत्रा, श्रध्दा कपूरसुध्दा पार्टीत दिसले.
'एक व्हिलन' 'आय सॉ द डेव्हिल' या कोरिअन सिनेमाच्या कहानीवर आधारित आहे. सिनेमात रितेशने नाकारात्मक भूमिका साकारली असून सिध्दार्थ आणि श्रध्दा प्रेमयुगलाच्या भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीक पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...