आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'किक\'च्या स्क्रिनिंगला जमली बॉलिवूडकारांची मांदियाळी, PIXमध्ये पाहा कोण-कोणते सेलेब्स पोहोचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('किक'च्या स्क्रिनिंगमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर आणि आलिया भट्ट पोहोचले)
मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा 'किक' हा सिनेमा आज (25 जुलै) सर्वत्र रिलीज झाला. या सिनेमासमोर आमिरच्या 'धूम 3'चा रेकॉर्ड मोडित काढून बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा दबाव आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सलमानने गुरुवारी रात्री बी टाऊनमधील सेलिब्रिटींसाठी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.
'किक' या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सहभागी होणा-या सेलेब्समध्ये रमेश तौरानी, अभिनेता महेश मांजरेकर, पुनीत इस्सर, किआरा आडवाणी, सुनील शेट्टी, अथिया शेट्टी, अभिनेत्री डेजी शाह, डेविड धवन, सूरज पंचोली, जॅकलीन फर्नांडिस, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, करण जोहर, साजिद नाडियाडवाला, अलविरा खान, अतुल अग्निहोत्री, आदित्य रॉय कपूरसह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते. सलमानची आई हेलन आणि वडील सलीम खानसुद्धा स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते.
'किक' हा सिनेमा निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात सलमान आणि जॅकलिनसह रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिमेश रेशमिया आणि हनी सिंग या सिनेमाचे संगीतकार आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'किक'च्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची खास झलक...