आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LFW 2014: रॅम्पवर दिसला अभिनेत्रींचा दिलखेचक अंदाज, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, श्रेया सरन आणि डेजी शाह)
मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2014च्या तिस-या दिवशी रॅम्पवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सनी आपला जलवा दाखवला. रॅम्पवर कॅटवॉक करणा-या सेलिब्रिटींमध्ये कोंकणा सेन शर्मा, चित्रांगदा सिंग, श्रेया सरन, नेहा धुपिया सौनल चौहान आणि डेजी शाह या अभिनेत्रींचा समावेश होता.
नेहा धुपिया
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया स्वाती विजयगर्गच्या शोची शोस्टॉपर होती. तिने यावेळी ऑरेंज साडी परिधान केली होती. नेहाची हेअरस्टाइलसुद्धा खूप स्टायलिश होती.
डेजी शाह
सलमानच्या 'जय हो' या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअर सुरु करणारी अभिनेत्री डेजी शाह या इव्हेंटमध्ये दिसली. तिने ब्लू कलरचा लाँग गाऊन परिधान केला होता. डिझायनर श्रुती संचेतीने हा गाऊन डिझाइन केला होता. तिचा हा गाऊन बॅकलेस होता.
श्रेया सरन
दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरन साडीत रॅम्पवर अवतरील होती. ग्रीन रेड कॉम्बिनेशनच्या साडीत तिने ज्वेलरी घातली होती. शशिकांत नायडू यांनी ही साडी डिझाइन केली होती.
चित्रांगदा सिंग
अभिनेत्री चित्रांगदा सिंग नववधूच्या रुपात रॅम्पवर अवतरली. तिने गोल्डन-रेड कॉम्बिनेशनचा लहेंगा परिधान केला होता. हर्शिता चॅटर्जीने हा लहेंगा डिझाइन केला होता.
कोंकणा सेन शर्मा
या इव्हेंटमध्ये कोंकणा ट्रेडिशन लूकमध्ये रॅम्पवर अवतरली होती. तिने कपाळावर मोठा चंदनाचा टीळा लावला होता. अनाविला शर्माने तिच्यासाठी साडी डिझाइन केली होती.
इतर अभिनेत्रींचीही दिसली झलक...
या इव्हेंटमध्ये अभिनेत्री टिस्का चोप्रा, सोहा अली खान, तनिषा मुखर्जी या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटची खास छायाचित्रे...