(आलिया भट्ट आणि हुमा कुरैशी)
नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया काउटर वीक 2014च्या तिस-या दिवशी अनेक नामवंत डिझायनर्सनी आपले कलेक्शन सादर केले. डिझायनर्सचे हे कलेक्शन सादर करण्यासाठी बॉलिवूड, टीव्ही मॉडेलिंग जगतातील अनेक सेलेब्स रॅम्पवर वॉक करताना दिसले.
श्रद्धा कपूर आणि कोयल राणा यांनी गौरव गुप्ताचे कलेक्शन सादर केले. तर मनीष मल्होत्रासाठी उर्मिला मातोंडकर, हुमा कुरैशी, आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट, अयान अली आणि दिव्या गुरुवारा हे सेलेब्स रॅम्पवर अवतरले होते.
यावेळी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आलियासाठी मनीष मल्होत्राचे कलेक्शन रॅम्पवर सादर करणे हे स्वप्नवत होते. ती म्हणाली, ''दोन वर्षांपूर्वी जेव्हा कतरिनाने मनीषसाठी रॅम्पवॉक केला होता, तेव्हा मी समोर बसून ते बघत होती आणि मी कधी मनीषसाठी रॅम्पवॉक करणार, याचा विचार करत होती. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. मी खूप आनंदी आहे.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मनीष मल्होत्रासाठी कोणकोणते सेलेब्स रॅम्पवर अवतरले होते...