आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs In Udaipur For Royal Wedding Of Hinduja Group Chairman

हिंदुजा ग्रुपच्या चेअरमनच्या शाही लग्नात बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उजवीकजे अमेरिकन पॉप सिंगर निकोल शेर्जिंगर)
उदयपूरः हिंदुजा ग्रुपचे चेअरमन संजय हिंदूजा आणि डिझायनर अनु मेहतानी यांच्या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्स मंगळवारी लेकसिटीत पोहोचले. शहरात तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये लग्नाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी संगीत आणि मेंदी सेरेमनी होणार आहे. मुख्य समारंभ गुरुवारी आहे. या कार्यक्रमात जेनिफर लोपेज सादरीकरण करणार आहे.
या सेलिब्रिटींचे झाले आगमन...
सिनेसृष्टीतून प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर, प्रिती झिंटा, अभिनेता डिनो मारिया, चंकी पांडे, संजय कपूर, सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हा, शशी कपूर यांची बहीण ऋतू कपूर, उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे चिरंजीव आदित्य मित्तल शाही लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी उदयपुरमध्ये दाखल झाले आहेत.
माणक चौकात करण्यात आली आकर्षक सजावट
सिटी पॅलेसच्या माणक चौकात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बुधवारी रात्री पॉप सिंगर निकोल आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार सादरीकरण करणार आहेत. मेंदीची विधी शिव निवास पॅलेसमध्ये दुपारी होणार आहे. संध्याकाळी जनाना महलमध्ये लेडीज संगीतचे आयोजन करण्यात आले आहे. तर लग्नाच्या विधी जगमंदिरमध्ये होणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाही लग्नात सहभागी होण्यासाठी उदयपूरमध्ये दाखल झालेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...