आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS:जुही, जितेंद्रसह या सेलेब्सचा झाला दादासाहेब फाळेक पुरस्काराने सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादासाहेब फाळके अॅकेडमीच्या वतीने देण्यात येणारा "दादासाहेब फाळकेरत्न पुरस्कार" ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांना राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते देण्यात आला. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना गौरवण्यात आले.
यावेळी फरहान अख्तर याला सर्वोत्कृष्ट अभिनेता, जुही चावला हिला 'गुलाब गॅंग' सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट विनोदवीराचा पुरस्कार कपिल शर्मा याला आणि सुनिधी चौहान हिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार देण्यात आला.
विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. या वेळी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. राज्यपालांनी पुरस्कार विजेत्या कलाकारांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी जितेंद्र म्हणाले, ''ज्या महान व्यक्तीने चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळत असल्यामुळे खूप आनंद झाला आहे.''
जुही म्हणाली, ''हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मी खूप आनंदीत आहे.''
याशिवाय टीव्ही अभिनेता गौतम रोडे याला 'सरस्वतीचंद्र' या मालिकेतील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करणअयात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील हिना खान हिला देण्यात आला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या अवॉर्ड सोहळ्याची खास क्षणचित्रे...