आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या स्टॅच्यूला परिधान केली साडी, म्यूझिअममध्ये या स्टार्सचेही आहेत मेणाचे पुतळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मदाम तुसाँ म्यूझिअममध्ये करीना कपूरचे दोन विविध छायाचित्रे)
करीनाच्या समोर करीना असा नजारा तुम्ही कधी पाहिला आहे का? पण असेही दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मदाम तुसाँ म्यूझिअममध्ये ठेवण्यात आलेल्या मेणाचा पुतळ्याला करीना डोळे भरून पाहताना दिसली. याच महिन्याच्या 16 तारखेला सैफ अली खानचा वाढदिवस होता. त्या निमित्त करीना पतीला सरप्राइझ पार्टी देण्यासाठी लंडनला पोहोचली होती. या पार्टीत तिचे शाळेतील मित्र-मैत्रीणी आणि सैफची मुलगी सारासुध्दा उपस्थित होती.
पार्टीनंतर करीना मदाम तुसाँ म्यूझिअममध्ये गेली होती. येथे तिच्या पुतळ्याचा मेकओव्हर करताना लाल रंगाची साडी परिधान करण्यात आली. ही साडी करीनाने 'रा-वन' सिनेमातील 'छम्मक छल्लो' गाण्यात नेसलेली होती. यापूर्वी तिच्या या पुतळ्याला काळ्या रंगाचा टॉप आणि लोअर परिधान केलेली होती. ही ड्रेस करीनाने 'जब वी मेट' सिनेमातील 'मौजा ही मौजा' गाण्यात घातलेला होता.
या म्यूझिअममध्ये करीनाचा हा पुतळ्याला गेल्या 3 वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. या पुतळ्याला बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आणि जवळपास दीड लाख पाउंड इतका खर्च आला होता.
मदाम तुसाँ म्यूझिअममध्ये करीनासह बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक स्टार्सचे पुतळे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अँजेलिना जोली, ब्रेड पिट, रॉबर्ट पॅटिनसनसह अनेक स्टार्सचे पुतळे सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मदाम तुसाँ म्यूझिअममध्ये ठेवण्यात आलेल्या स्टार्सच्या पुतळ्यांची छायाचित्रे...