आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs With Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray

हिंदी-मराठी सिनेसृष्टीशी होते बाळासाहेबांचे अनोखे नाते, पाहा आठवणीतील छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आठवणीतील छायाचित्रेः दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अमिताभ बच्चन, रजनीकांत, लता मंगेशकर आणि माधुरी दीक्षित)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी यांचे नाते अनोखे होते. कित्येक कलाकार आणि तंत्रज्ञांना बाळासाहेबांनी मदत केली आहे. कित्येकांचे प्रश्‍न शिवसेनाप्रमुखांनी चुटकीसरशी सोडवले. त्यामुळे सिनेसृष्टीत बाळासाहेबांचे नाव आदराने घेतले जाते. कलाकारांच्या घरांचा प्रश्‍न असो किंवा त्यांची अन्य एखादी समस्या असो; बाळासाहेबांनी नेहमीच त्यांना मदतीचा हात दिला. मराठी सिनेमे आणि नाटकांना त्यांनी सदोदित प्रोत्साहन दिले होते.
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. गानकोकिळा लता मंगेशकर यांचीही ते नेहमी आपुलकीने चौकशी करत असत.
सुमारे 18 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या आमंत्रणावरून मायकल जॅक्सन मुंबईत आला होता. तेव्हा मुंबईत पोहोचल्यानंतर मायकल जॅक्सन सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचला होता. तेव्हा बाळासाहेबांनी मायकलला भेट म्हणून चांदीचा तबला आणि तानपुरा दिला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बाळासाहेबांची कलाकारांसोबतची आठवणीतील निवडक छायाचित्रे दाखवत आहोत...