आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celina Jaitley Files Police Complaint Against Elephant Sunder’S Mahout And Mla Vinay Kore

'सुंदर' हत्तीच्या मुक्तीसाठी सेलेना सरसावली, आमदाराविरोधात दाखल केली FIR

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सेलेना जेटलीने 'पेटा'व्दारे एका आमदाराविरोधात 'सुंदर' हत्तीला साखळदंडातून मुक्त करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
सेलेना जेटलीसह जॅकलीन फर्नांडिस, पॉल मॅककार्टनी, पामेला एंडर्सनसारखे कलाकार या अभियानाशी जोडलेले आहेत. तसेच, 'सुंदर' हत्तीला तत्काळ बंगळूरच्या अभयारण्यात पाठवण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूरचे आमदार विनय कौर यांनी 2007मध्ये ज्योतिबा मंदिराला 'सुंदर' हत्ती दान केला होता. सध्या त्या हत्तीला साखळदंडाने जखडून ठेवण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सेलेनाने सोमवारी कोलाबा पोलिस स्टेशनमध्ये आमदार विनय कौर यांच्याविरोधात केस दाखल केली आहे. तक्रारीमध्ये सेलेनाने 'सुंदर' हत्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असूनदेखील त्याला साखळदंडाने जखडून ठेवण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
सेलेनाच्या सांगण्यानुसार, 'सुंदरची अशी स्थिती बघून मन हेलावत होते. त्याचे ओरडणे तुम्हाला अस्वस्थ करणारे होते. आपल्या देशात अनेक प्रातांत हत्तीची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी त्याला कैद करून त्याच्यावर अन्याय केला जातो. एवढेच नाही तर, त्यांना काम करण्यास मजबूर केले जाते.'
'सुंदर'ला वाचवण्यासाठी या मोहिमेला दिर्घकाळ उलटून गेला आहे. सेलेनाने 'पेटा'मध्ये सामील झाल्यानंतर या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आता या मोहिमेमध्ये गुलशन ग्रोवरसुध्दा सामील झाले आहेत. त्यांनी पेटाव्दारे महाराष्ट्राचे वनमंत्र्यांना पत्र लिहून 14 वर्षांनंतर एका हत्तीला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.
पेटाशी (पीपल्स फॉर इथिकल ट्रीटमेन्ट ऑफ अ‍ॅनिमल्स) संबंधीत प्रकरणात 3 मार्च 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्वरीत माजी वनमंत्री पतंगराव कदम यांना पत्र लिहण्यात आले होते. पेटाने सुंदरला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा पेटासाठी सेलेना जेटलीच्या फोटोशुटची काही निवडक छायाचित्रे...