आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिंपलच्या या सीनवर सेन्सॉरने चालवली कात्री, या सिनेमांच्या दृश्यांवरही घेण्यात आला होता आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फाइंडिंग फॅनी'च्या या दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे.)
मुंबई: अलीकडेच, सेन्सॉर बोर्डाने साईओ राकेश कुमार यांच्यावर लाच घेऊन सिनेमाला सर्टिफिकेट दिल्याचे आरोप लागला होता. या आरोपांनंतर सेन्सॉर बोर्ड जास्तच सावध झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक सिनेमातील आपत्तीजनक सीन्सवर सेन्सॉर आक्षेप घेत आहेत. होमी अदजानिया दिग्दर्शित 'फाइंडिग फॅनी' सिनेमातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेतल्याची बातमी समोर आली आहे.
सेन्सॉर बोर्डाने यापूर्वीदेखील अनेक सिनेमांच्या बोल्ड सीन्सवर आक्षेप घेतला आहे. अलीकडेच, रिलीज झालेल्या 'हेट स्टोरी 2' सिनेमातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने उत्तेजक सीन्स सांगून काढून टाकले होते. 'मिस लव्हली', 'देल्ली बेली' आणि 'चक्रव्ह्यूव'सारख्या सिनेमांतील सीन्सवरसुध्दा सेन्सॉरने कात्री चालवली आहे.
'फाइंडिंग फॅनी'
होमी अदजानियाचा 'फाइंडिंग फॅनी'मधून दीपिका पदुकोणच्या 'आय अ‍ॅम व्हर्जिन'सारख्या संवादावर आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने सिनेमामधून डिंपल कपाडियाच्या 'बम' सीनवर कात्री चालवली आहे. सेन्सॉर बोर्डानुसार, हा सीन अश्लिल आहे. दीपिका पदुकोणच्या संवादावर आक्षेप घेतल्यानंतर होमी अदाजानिया सेन्सॉर बोर्डाला म्हणाले, की यापूर्वी '2 स्टेट्स' आणि 'दिल से' सिनेमांत असे संवाद पास झाले आहेत.
डिंपल यांनीसुध्दा आपल्या सीन्सवर घेतलेल्या आक्षेपावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, 'सेन्सॉर बोर्डाने सिनेमात किसींग सीन्स आणि न्यूडिटीला पास केले आहे. परंतु माझ्या 'बम'च्या सीनवर आक्षेप घेतला आहे. माझ्याकडे अशा लोकांसाठी कोणतेच शब्द नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'रागिनी एमएमएस 2'पासून ते 'जीस्म 2'पर्यंत कोण-कोणत्या सीन्सवर सेन्सॉरने चालवली कात्री...