आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Censor Board Objection On The Word Virgin In The Film Finding Fanny

\'फाइंडिंग फॅनी\'मधील \'व्हर्जिन\' शब्दामुळे एका सीनवर सेन्सॉरने चालवली कात्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फाइंडिग फॅनी'च्या एका सीनमध्ये दीपिका पदुकोण)
मुंबई: दिग्दर्शक होमी अदजानियाच्या 'फाइंडिग फॅनी' सिनेमामधील एका सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. सिनेमाच्या एका सीनमध्ये दीपिका पदुकोण अर्जुन कपूरला म्हणते, 'मी व्हर्जिन आहे.' सेन्सॉर बोर्डाने या संवादावर आक्षेप घेत दिग्दर्शकाला आदेश दिला, की सिनेमातून हा सीन काढून टाकण्यात यावा.
दिग्दर्शकाने बोर्डासमोर अनेक उदाहरण ठेऊन समजावण्याचा प्रयत्न केले, की यापूर्वी 'दिल से' (1998), '2 स्टेट्स' (2014)सारख्या सिनेमांमध्ये असे संवाद दाखवण्यात आले आहेत. पण सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाचे काहीच ऐकून घेतले नाही. बोर्डाने दिग्दर्शकाला सांगितले सिनेमाला UA सर्टिफिकेट हवे असेल तर हा सीन काढून टाकण्यात यावा.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, दिग्दर्शकाच्या विनंतीनंतर बोर्डाने 2 मीनिटांचा हा सीन पूर्ण न दाखवता फक्त फ्लॅशमध्ये दाखवण्याची परवानगी दिली आहे. याविषयी होमी अदजानियाकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये.
अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण अभिनीत हा सिनेमा 2 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होत आहे. सिनेमात पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह आणि डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातील काही दृश्ये...