आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Censor Board Says No To Cleavage Show In \'Xpose\'

\'XPOSE\'मध्ये हिरोइनने केले Expose, सेन्सॉरने चालवली कात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एक्सपोझ' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही बोल्ड सीन्सवर सेन्सॉर बोर्डने आक्षेप घेतला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये झोया अफरोज खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. सेन्सॉर बोर्डने सिनेमा निर्मात्यांना या सीन्सला ब्लर करण्याचे आदेश दिले आहेत.
एका प्रसिध्द वर्तमानपत्राच्या अहवालानुसार, झोयाच्या या बेल्ड सीन्सवर बोर्डाने विशेष आक्षेप दाखवला आहे. त्यामध्ये ती बिकिनी परिधान करून बीचवर चालत आहे. बोर्डाने सिनेमा निर्मात्यांना सांगितले आहे, की सीनमध्ये झोयाने जास्त अंगप्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्या सीनला पुसटसा केला जावा.
सेन्सॉर बोर्डाच्या संबंधीत एका सुत्राने सांगितले, की दुस-या सीनमध्ये मद्याच्या ब्रँडचे नाव स्पष्ट दिसून ये असल्याने तो सीनही ब्लर पुसटसा करण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. सिनेमाचा क्रिएटीव्ही निर्माता राकेश उपाध्यायचे म्हणणे आहे, की तीन मिनीटांच्या प्रोमोमध्ये असे सीन दाखवणे कठिण आहे. मद्याच्या ब्रँडविषयी सांगायचे झाले तर ते चुकिने आले आहे. परंतु बिकिनी सीन त्यांनी स्वत:हून घेतले आहेत.
हा 60-70च्या दशकातील सिनेमा आहे. सिनेमात हिमेश रेशमिया, यो यो हनी सिंह, इरफान खान, सोनाली राऊत, झोया अफरोज यांच्या मुख्य भूमिका आहेत. हिमेशने सिनेमाची निर्मिती केली आहे. 23 मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
सनी लिओनच्या 'रागिनी MMS 2'मधूनसुध्दा सेन्सॉर बोर्डाने असेच काहीस सीन्स काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये सनी खूपच बोल्ड दिसत होती. परंतु अलीकडेच इंटरनेटवर त्या सीनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि कोणत्या बघा पोस्टर्स आणि सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने घातली बंदी...