आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधा-सौरभच्या संसारात अडथळ्यांची मालिका ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रेम माणसाला सारं काही शिकवतं, प्रेम माणसाला जगण्याचं बळ देतं - याचाच अनुभव सध्या 'झी मराठी'वरील 'राधा ही बावरी' मालिकेतील राधाला येत आहे. प्रथितयश डॉक्टर म्हणून काम करीत असलेल्या राधाने सर्वांचा विरोध पत्करून तिच्यापेक्षा वयाने लहान, कमी शिकलेल्या, अल्लड सौरभशी प्रेमविवाह केला. या लग्नामुळे सौरभच्या वहिनीने - सीमाने राधा-सौरभसाठी सौरभच्या घराचे दरवाजे अपेक्षेप्रमाणेच कायमचे बंद करून टाकले आणि राधाच्या घरात सौरभ-राधाचा राजाराणीचा संसार सुरू झाला. मात्र संसारात प्रेमाबरोबरच जबाबदा-याही असतात, याची जाणीव राधाला लगेच झाली.

आजवर स्वयंपाकाशी संबंध न आलेल्या राधाच्या खांद्यावर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कर्तव्य पार पाडण्याबरोबरच आता उत्तम गृहिणी म्हणूनही जबाबदारी पडली आहे. घरातली कामं, स्वयंपाक आणि मुख्य म्हणजे शिक्षण किंवा नोकरी- काहीही न करता नुसत्या उनाडक्या करणा-या, बालिश सौरभला त्याच्या जबाबदा-यांची जाणीव करून देणं, या सा-या गोष्टी आता राधाला पार पाडायच्या आहेत. अर्थात राधाने ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे. आजवर स्वयंपाकात रस नसलेली राधा आता आवडीने एकेक पाककृती शिकू लागली आहे. तसंच सौरभच्या करियरकडेही गांभीर्याने लक्ष देण्याचं तिने ठरवलं आहे. पण राधाच्या या वाटचालीत दोन मोठी संकटं उभी ठाकली आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या राधा-सौरभसमोर कुठली संकटं उभी आहेत...