आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखा झळकणार मधुबालाच्या रुपात, 'जब प्यार किया तो...'वर धरणार ताल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आगामी 'सुपर नानी' या सिनेमाच्या एका दृश्यात अभिनेत्री रेखा)
मुंबईः 70 आणि 80च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत आपली जादू दाखवणारी अभिनेत्री रेखा या दिवाळीत 'सुपर नानी'च्या रुपात सिल्व्हर स्क्रिनवर कमबॅक करत आहे. या सिनेमातील एका दृश्यात रेखा मधुबालाच्या लूकमध्ये झळकणार आहे. तिचा हा लूक मधुबालाच्या 'जब प्यार किया तो डरना क्या' या गाण्यातील लूकसोबत साधर्म्य साधणार आहे. तसे पाहता रेखा यापूर्वी म्हणजे 1981 मध्ये 'उमराव जान' या सिनेमात काहीशा अशाच रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमातील एका गाण्यात रेखा मधुबालाच्या 'मुगल-ए-आजम' आणि वहीदा रहमानच्या 'हावडा ब्रिज' या सिनेमांमधील लूकमध्ये झळकणार आहे. हे गाणे शबीना खान यांनी कोरिओग्राफ केले आहे.
'सुपर नानी' या सिनेमाद्वारे रेखा ब-याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात शर्मन जोशी, श्वेता कुमार, अनुपम खेर आणि रणधीर कपूर दिसणार आहेत. इंद्र कुमार या सिनेमाचे दिग्दर्शक असून येत्या 24 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा रेखाचा मधुबालाच्या रुपातील लूक...