आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन चेतन भगत यांनी केले होते गर्लफ्रेंड अनुषासह लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - लेखक चेतन भगत आणि त्यांच्या पत्नी अनुषा)
लेखक चेतन भगत तरुणांसाठी आदर्श आहे. जे तरुण आपला छंद जपत आयुष्यात काही करु इच्छितात, अशा तरुणांसाठी ते प्रेरणास्थानी आहेत. चेतन यांचे आयुष्य एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळे नाहीये. शिक्षण, नोकरी आणि लग्न, या सगळ्या गोष्टींचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले. विशेषतः वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन गर्लफ्रेंड अनुषासोबत लग्न करण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता.
अनेक बेस्ट सेलिंग नॉव्हेल लिहिल्यानंतर चेतन यांनी 'किक' या सिनेमाद्वारे स्क्रिनप्लेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी ते नर्व्हस होते, मात्र सिनेमाला मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहून ते आता समाधानी आहेत.
जाणून घ्या चेतन भगत यांच्याविषयी...
दिल्लीत झाले शिक्षण...
22 एप्रिल 1974 रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात चेतन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आर्मीत होते, तर आई सरकारी नोकरी करायच्या. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर IIT दिल्लीतून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. IITमधील अनुभवांवर चेतन यांनी 'फाइव्ह पॉईंट सम वन' हे पुस्तक लिहिले. याच पुस्तकावर '3 इडियट्स' या सिनेमाची निर्मिती झाली होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. IIM अहमदाबाद चेतन यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली.
हाँगकाँगमध्ये होते इन्व्हेस्टर बँकर...
IIMमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेतन यांनी जवळजवळ अकरा वर्षे इन्व्हेस्टर बँकर म्हणून नोकरी केली. हाँगकाँगमधील Goldman Sachs आणि त्यानंतर Deutsche Bank येथे त्यांनी काम केले. 2009 मध्ये ते मुंबईत स्थायिक झाले. चेतन यांची पत्नी अनुषासुद्धा बँकेत नोकरीला आहे. हाँगकाँगमधून अनुषाची बदली झाल्यामुळे चेतनसुद्धा मुंबईत आले.
सोपे नव्हे अनुषासोबत लग्न करणे...
अलीकडेच रिलीज झालेला '2 स्टेट्स' हा सिनेमा चेतन आणि अनुषा यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित होता. अहमदाबाद येथी IIM कॅम्पसमधून त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. चेतन पंजाबी आहेत, तर अनुषा तामिळ आहे. दोन राज्यांमधील अंतर हे त्यांच्या लग्नातील अडथळा निर्माण करणारे होते. चेतनचे आईवडील या लग्नसाठी तयार नव्हते. आपल्या शिकलेल्या मुलासाठी ते आपल्याच समाजातील मुलगी शोधत होते. मात्र चेतन यांनी अनुषाची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. अलीकडेच चेतन यांनी खुलासा केला होता, की त्यांच्या लग्नात त्यांचे वडील उपस्थित नव्हते.
पॅशनसाठी सोडली नोकरी...
इन्व्हेस्टर बँकरची नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक होण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यांनी त्याची सुरुवातीची तीन पुस्तके (फाइव पॉईंट सम वन, वन नाइट अॅट द कॉल सेंटर, 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ) बँकेत नोकरी करत असताना लिहिली होती. एका फ्रेंच जर्नलिस्टने चेतन यांनी फुलटाइम रायटिंग करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी पत्नी अनुषाची भारतात बदली झाली. मुंबईत स्थायिक झाल्यानंतरसुद्धा चेतन यांनी एक वर्षभर नोकरी केली. मात्र नंतर आपला छंद जोपासण्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
या पुस्तकांवर तयार झाले सिनेमे... चेतन यांनी आत्तापर्यंत सहा पुस्तके लिहिली. त्यापैकी चार पुस्तकांवर सिनेमे तयार झाले आहेत.
बुक- फाइव्ह पॉईंट सम वन सिनेमा - 3 इडियट्स
बुक- वन नाइट अॅट कॉल सेंटर सिनेमा - हॅलो
बुक- 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ सिनेमा - काई पो छे
बुक- 2 स्टेट्स- द स्टोरी ऑफ माय मॅरिज सिनेमा - 2 स्टेट्स
बुक- रिव्हॉल्यूशन 2020
बुक- वॉट यंग इंडिया वान्ट्स
अनुषाच्या साधेपणावर भाळले होते चेतन...
IIM कॅम्पसमध्ये अनेक तरुणांना अनुषाच्या साधेपणाने भूरळ घातली होती. मात्र अनुषाचे सूत जुळले ते चेतन भगत यांच्याबरोबर. सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग ही गोष्ट दोघांमध्ये साधर्म्य साधणारी होती. आपल्या कौशल्याच्या बळावर चेतन आज सेलिब्रिटी बनले आहेत. मात्र अनुषा आजही लाइमलाइटपासून स्वतःला दूर ठेवते. बँकेच्या नोकरी ती आनंदी आहे. या दाम्पत्याला जुळी मुले आहेत. श्याम आणि ईशान ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पत्नी आणि मुलांसोबतची चेतन यांची खास छायाचित्रे...