आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: \'ब्लॅक\'मधील ही चिमुरडी झाली हीरोईन, भेटा 10 चाइल्ड आर्टिस्टना ज्या आता आहेत अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - आयशा कपूर)
अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर 'ब्लॅक' (2005) या सिनेमात झळकलेली बालकलाकार आयशा कपूर लवकरच अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शेखर कपूर यांच्या आगामी 'पानी' या सिनेमाद्वारे ती हीरोईन म्हणून झळकणार आहे.
शेखर कपूर 'ब्लॅक' या सिनेमातील आयशाच्या अभिनयाने इम्प्रेस झाले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी तिला साइन केले आहे. यशराज बॅनरच्या या सिनेमात आयशासह सुशांत सिंह राजपूत लीड रोलमध्ये आहे.
आयशाने 'ब्लॅक' सिनेमात राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय ती सुधीर मिश्रांच्या 'सिकंदर' या सिनेमातदेखील झळकली आहे.
तसे पाहता, बालकलाकाराच्या रुपात आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करणारी आयशा एकमेव नाहीये. बालकलाकार ते अभिनेत्री असा प्रवास करणा-या अभिनेत्रींची लांबलचक यादी बॉलिवूडमध्ये बघायला मिळते. यामध्ये उर्मिला मातोंडकर, हंसिका मोटवानी आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये भेटा अशाच काही अभिनेत्रींना, ज्यांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली होती...