आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो रोज खातो एक लाइट बल्ब!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाण्याचे अनेक पदार्थ त्याच्या वासामुळे वा चवीमुळे आपण परत परत खातो हे माहीत होते. मात्र, चीनमधील एका महाशयाचा असा दावा आहे की गेल्या 40 वर्षांत त्याने नाश्ता म्हणून जवळपास 1500 ग्लास बल्ब फस्त केले. वँग झियानझून हे या महाशयाचे नाव असून ते 54 वर्षांचे आहेत.
आता ही सवय त्यांना कशी लागली? तर त्याच्या लहानपणी एकदा या महाशयाने चुकून माशाचा काटा गिळला. त्याचे आईबाबांना काळजी वाटली की याच्या पोटाचे काय होणार पण वँगला काहीच झाले नाही. मग स्वत: त्याची उत्सुकता बळावली व त्याने बल्बचे काही तुकडे खाऊन पाहिले, पण त्याला काही झाले नाही. मग काय त्याला असे तुकडे खायची सवय लागली.
हळूहळू त्याने या तुकड्याची मात्रा वाढविली. आजही तो सकाळच्या न्याहरीत एक बल्ब व ग्लासभर पाणी घेतो. त्याच्या मते हे खूपच छान व डेलिशयस फूड आहे.