आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे महेश भट्ट यांची नवी HEROINE, तिचा अभिनय बघून आलियाला कोसळले होते रडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: बुधवारी दिल्ली पुन्हा एकदा बॉलिवूडच्या लखलखत्या जगात बुडताना दिसली. आपल्या 'सिटी लाइट्स' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेले महेश भट्ट यांच्यासह त्यांची पूर्ण टीम सांग्री-ला हॉटेलमध्ये पोहोचली होती. महेश भट्ट यांच्यासोबत सिनेमाचा अभिनेता राजकुमार राव आणि हिरोईन पत्रलेखासुध्दा पोहोचली होती. यांच्यासोबत नॅशनल अवॉर्ड दिग्दर्शक हंसल मेहतासुध्दा दिसले. या चौघांनी दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी सिनेमाचा परिचय पत्रकारांना करून दिला. यावेळी कार्यक्रमात सिनेमाची अभिनेत्री खूप आनंदी दिसून येत होती. महेश भट्ट यांचा 'सिटी लाइट्स' हा पत्रलेखाचा पदार्पणाचा सिनेमा आहे. पहिल्याच सिनेमात दोन नॅशनल अवॉर्ड विजेत्यासह काम करणे बॉलिवूडमध्ये तिच्या एंट्रीला धमाकेदार नक्कीच बनवेल. पत्रलेखाही कदाचित अशीच अपेक्षा आहे.
सिनेमाचा स्पशेल स्क्रिनिंगमध्ये आलिया भट्ट या सिनेमांच्या कलाकारांचा अभिनय बघून स्वत:चे अश्रु थांबवू शकली नव्हती. या सिनेमामध्ये मुख्य भूमिका राजकुमार राव आणि नवोदित अभिनेत्री पत्रलेखाची आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने स्क्रिनिंगला पोहोचलेल्या लोकांना भावूक करून टाकले. 'सिटी लाइट्स' सिनेमाचे दिग्दर्शन दिग्दर्शक हंसल मेहताने केले आहे. तसेच, संवेदनशील मुद्यांच्या आधारावर हा सिनेमा तयार झालेला आहे. हंसल मेहता यांच्या नॅशनल अवॉर्ड विजेता 'शहिद' सिनेमामध्येसुध्दा राजकुमार रावने मुख्य भूमिका साकारली होती. 'सिटी लाइट्स' भारतात 1 मे रोजी प्रदर्शित झाला असून फॉक्स स्टार स्टुडिओ आणि विशेष फिल्मच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सिनेमाच्या सर्व स्टार्सची छायाचित्रे
फोटो: भूपिंदर सिंह