आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collection Of Bang Bang Is 94.13 On Domestic Box Office

हृतिक मोडू शकला नाही खान्सचा रेकॉर्ड, 100 कोटींचा गल्ला जमवण्यात \'बँग बँग\' अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन आणि आमिर खान)
मुंबई: हृतिक रोशनच्या 'बँग बँग'ने बॉक्स ऑफिसवर 4 दिवसांत 94.13 कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र पहिल्या आठवड्यात सिनेमा 100 कोटींची कमाई करण्यात अपयशी ठरला. 'बँग बँग' ज्या वेगाने कमाईच्या बाबतीत पुढे जात आहे त्यावरून असे वाटते, की 100 कोटींचा व्यवसाय करण्यात सिनेमा यशस्वी होऊ शकतो. परंतु पहिल्या आठवड्यात सिनेमाने केवळ 94.13 कोटींपर्यंत उडी घेतली आहे.
बँग बँग' गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला होता. सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (BO) 27.54 कोटींची कमाई केली. दुस-या दिवशी 24.08 कोटींचा गल्ला जमावला. तिस-या दिवशी अर्थातच शनिवारी 20.01 कोटींचा व्यवसाय करून रविवारी 22.41 कोटींच्या घरात सामील झाला. अशाप्रकारे चार दिवसांत अर्थातच पहिल्या आठवड्यात सिनेमाने 94.13 कोटींची कमाई केली.
सिध्दार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'बँग बँग' पाच हजारांपेक्षा जास्त स्क्रिनवर रिलीज झाला. 'बँग बँग'ला आतापर्यंत सुट्यांचा फायदा झाला आहे. हा सिनेमा तामिळ आणि तेलगू भाषांमध्येसुध्दा प्रदर्शित करण्यात आला आहे.
'धूम 3' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'चा विक्रम मोडित काढू शकला नाही
'बँग बँग' बॉक्स ऑफिसवर ज्या वेगाने कमाई करत आहे, त्यावरून काही वेळा वाटले, की सिनेमा 'धूम 3' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'चा विक्रम मोडीत काढू शकतो. 'धूम 3' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'ने पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा व्यवसाय केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हृतिक कसा राहिला खान्सच्या मागे...