आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gutthi Aka Sunil Grover’S Funny Walk In Sari With Mandira Bedi In Fashion Show

PICS: 'गुत्थी'च्या कॅटवॉकला मिळाल्या प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या आणि शिट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('गुत्थी'च्या रुपात रॅम्पवॉक करताना मंदिरा बेदीसोबत कॉमेडियन सुनील ग्रोवर)
मुंबईः कॉमेडी विश्वात 'गुत्थी'च्या नावाने प्रसिद्ध असलेला कॉमेडियन सुनील ग्रोवर रविवारी एका फॅशन शोमध्ये दिसला. या फॅशन वीकच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सुनील उर्फ 'गुत्थी' साडी परिधान करु रॅम्पवर अवतरला होता. यावेळी 'गुत्थी'ने मंदिरा बेदीने डिझाइन केलेली साडी परिधान केली होती.
या इव्हेंटमध्ये मंदिरा बेदीचे क्वर्क अँड क्लासिक (QUIRK AND CLASSIC) साडी कलेक्शन मॉडेल्सनी रॅम्पवर सादर केले. या मॉडेल्ससह सुनील ग्रोवरनेही रॅम्पवॉक केला. यावेळी गुत्थीच्या रुपात रॅम्पवर अवतरलेल्या सुनीलचा विनोदी अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला. गुलाबी साडी, बॅकलेस ब्लाउज, दोन वेण्या आणि कपाळावर मोठे कुंकू या रुपात गुत्थी रॅम्पवर अवतरली होती. यावेळी तिने ब-याच विनोदी पोजसुद्धा दिल्या. गुत्थीचा हा अंदाज बघून उपस्थितांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवल्या.
यावेळी सुनील आणि मॉडेल्ससोबत मंदिरा बेदीनेदेखील रॅम्पवॉक केल्या. यावेळी मंदिरा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. तिने स्लिव्हलेस टॉप आणि जीन्स परिधान केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गुत्थीची रॅम्पवॉकची छायाचित्रे...