आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Complaint Against Bachchan Filed In Merat Court, Divya Marathi

बच्चन यांच्याविरोधात मेरठ कोर्टात तक्रार, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात बच्चन यांच्या एका जाहिरातीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना आठ ऑक्टोबरपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे.
बच्चन यांनी गुजरात सरकारची जाहिरात करताना ‘नवरात्र बिना गुजरात कहां, गुजरात बिना नवरात्र कहां’ असा संवाद म्हटला होता. त्यांच्या या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार रश्मी या महिलेने केली आहे. त्यांचे म्हणणे असे होते की, देशाच्या विविध भागांत नवरात्रोत्सव भक्तिभावनेने साजरा होतो. परंतु बच्चन यांच्या जाहिरातीमुळे इतर भागांतील नवरात्र उत्सव कमी लेखला जातो. यामुळे आपल्या भावना दुखावल्याची त्यांची तक्रार आहे.