आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Statement Of Maharashtra Minister On Rani Mukherjee

राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप सोपल यांनी पातळी सोडली, राणी मुखर्जीवर केले वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईच्या पोलिसांच्या कार्यक्रमादरम्यान राणी मुखर्जी)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री दिलीप सोपल यांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीवर आपत्तीजनक टिका केली आहे. ही एक घटना काल (21 ऑगस्ट) सांगलीतील तासगावमध्ये घडली. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप सोपल यांचा सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यावेळी गृहमंत्री आबा यांची स्तुती करताना सोपलांची जीभ चांगलीच घसरली.
सोपल म्हणाले, बुधवारी राणी मुखर्जी आबांशी हस्तांदोलन करू इच्छित होती. तर, आबा मागे सरकत होते व हातही घट्ट धरून बसले होते. अहो आबा, राणी मुखर्जी आता आऊटडेटेड झाली आहे. तुम्ही अगदी करीना कपूरचा हात हातात घेतला तरी तुमच्यासारख्या सज्जन माणसांवर कोणी शंका घेणार नाही.
बुधवारी (20 ऑगस्ट) मुंबईत पोलिसांच्या महिला बीट मार्शलच्या टीमला पोलिस सेवेत सामील करून घेण्याच्या समारंभात अभिनेत्री राणी मुखर्जीला बोलाविण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री आर आर पाटील उपस्थित होते. यावेळी राणी मुखर्जीने सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह आबांशी हस्तांदोलन केले होते.

हाच धागा पकडून सोपल यांनी राणी मुखर्जीने हातात हात देताना आबांची झालेली अवस्था पाहून आबा कसे सज्जन व्यक्ती आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी ते एका महिलेचा अपमान करीत आहेत हे विसरले.
दरम्यान, सोपल यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सोपल यांना आबांच्या चरित्र्याचे सर्टिफिकेट देण्यास कोणी सांगितले आहे. आबा सज्जन आहेत हे सांगण्याची त्यांच्यावर वेळ आली यावरून आजच्या पुरुषी राजकारणी लोकांची विकृत मानसिकता दिसून येते. कोणतीही अभिनेत्री व महिला कधीही आऊटडेटेड होत नसते. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप सोपल आता अडचणीत येऊ शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमादरम्यानची राणी मुखर्जीची छायाचित्रे...