आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Copy Cat Tag Goes To Aishwarya Rai Bachchan For Her Golden Gown

Cannes 2014: ऐश्वर्यावर लागला कॉपी कॅटचा टॅग, गोल्डन गाऊनवरून उपस्थित झाले प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान्स फेस्टिव्हल 2014च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा भारतातीलच नव्हे तर सर्व जगभरातील चाहते अतुरतेने वाट बघत होते. अखेर, 21 मे रोजी ऐश्वर्या रेड कार्पेटवर गोल्डन गाऊनमध्ये अवतरली. सर्व माध्यम ऐश्वर्याची एक-एक झलक घेण्यासाठी गर्दी करत होते. या दिवशी ती सर्वत्र झळकली. गोल्डन गाऊनमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये तिने रेड कार्पेटवर जो जलवा दाखवला तो दिर्घकाळ टिकू शकला नाही. कारण ऐश्वर्याने जो सुंदर ड्रेस परिधान केला होता तसा हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टनी चेनोवेथने मार्चमध्ये ऑस्कर अवॉर्ड्स 2014च्या डॉल्बी थिएटरमध्ये हूबेहूब ड्रेस परिधान केला होता. ऐश्वर्या या ड्रेसमध्ये सर्वात सुंदर दिसली, परंतु 2014 कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये तिच्यावर कॉपी कॅटचा टॅगसुध्दा लागला.
या दोन्ही अभीनेत्रींच्या ड्रेसमध्ये काहीच फरक नव्हता. ऐश्वर्याचा गोल्डन गाऊन हूबेहूब क्रिस्टनीच्या गाऊनसारखा होता. कटपासून ते डिझाइनपर्यंत गोल्डन Roberto Cavalli स्ट्रेपलेस गाऊनमध्ये काहीच वेगळेपण नव्हते. फरक एवढाच होता, की हा गाऊन क्रिस्टनीपेक्षा ऐश्वर्यावर जास्त शोभून दिसत होता.
ऐश्वर्या मागील 13 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी तिच्या ड्रेस आणि लूक्सविषयी माध्यमांमध्ये आणि सर्व फॅशन जगात नेहमी उत्सूकता असते. या गोल्डन गाऊनमध्ये ऐश्वर्या जलपरिप्रमाणे दिसत होती. परंतु नवीन डिझायइनचा ड्रेस परिधान केला असता तर तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली असती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रींनी हॉलिवूड अभिनेत्रींना कॉपी केले आहे. सोबतच, ऐश्वर्याने गोल्डन गाऊनमध्ये कसा दाखवला जलवा...