आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Asks Aamir Khan To Reply To Suit On PK Movie News In Marathi

PK पोस्टरवरुन आमिर अडचणीत, सिव्हिल कोर्टाने बाजू मांडण्याचा दिला आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- PK चे पोस्टर आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सिव्हिल कोर्टाने अभिनेता आमिर खानला आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे.
सिव्हिल न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या न्यायालयाने आमीर खानला सोमवारी (ता. 25) आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. PK चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आमिर खान रेल्वे मार्गावर हातात रेडिओ घेऊन दिसतो. यावेळी त्याने सगळे कपडे काढले आहेत. या पोस्टरमुळे कलाकारावर अश्लीलतेचा गुन्हा दाखल का करु नये, अशी विचारणा कोर्टाने केली आहे.
हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आमिर खान, चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, PK च्या पोस्टरसंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने नुकतीच फेटाळली होती. पोस्टर बघायचे नसेल, चित्रपट बघायचा नसेल तर बघू नका, असे कोर्टाने यावेळी म्हटले होते.